पारधी समाजातील तरूणांना नोकरी करण्याची मोठी संधी- रंजनकुमार शर्मा

author Pune Metro   11 мес. назад
1,232 views

16 Like   1 Dislike

साईकृपा शुगर अँड अलाईड इन्डस्ट्रीचा अग्निप्रदीपन सोहळा...

श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील साईकृपा शुगर अँड अलाईड इन्डस्ट्रीस या साखर कारखान्याचा १६ व अग्निप्रदीपन सोहळा आणि गळीत हंगाम शुभारंभ काल पार पडला.अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीगोंदा तालुक्यातील ५१ प्रगतशील शेतकरी जोडप्यांच्या हस्ते हा शुभारंभ करण्यात आलाय.

दरोडेखोर बनला साधू, ओळख लपविण्यासाठी केले वेषांतर, नगर प...

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील सराफ दरोड्यातील मास्टर mind मुख्य आरोपी पपड्या काळे याला अटक करण्यात अहमदनगरमधील स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय. कोपरगाव येथील लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानाचे मालक गणेश धाडगे आणि श्याम धाडगे यांच्यावर अनोळखी दरोडेखोरांनी गोळीबार करून श्याम धाडगे यांची हत्या करून दुकानातील सोन्या चांदीचे दागिने दरोडा टाकून चोरण्यात आले होते. या घटनेबाबत कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक दिलीप पवार त्यांच्या पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी योग्य तपास करून वर्धा येथील निवासित असलेला आरोपी महादेव काळे याच्या टोळीतील १३ आरोपी आणि चोरीचे सोने विकत घेणारे ३ सराफ असे एकूण १६ आरोपीना अटक केली आहे.यासंदर्भात नगरमध्ये एसपी ऑफिसला पत्रकार परीषदेच आयोजन करण्यात आल होत.या परिषदेमध्ये अधिक माहिती या घटनेबद्दल देण्यात आलीय.

जवान दिगंबर शेळकेचे पार्थिव घेतले ताब्यात शहिद घोषित कर...

येवला तालुक्यातील मानोरी गावचे सी आर पी एफ मधील जवान दिगंबर शेळके यांचं पार्थिव अखेर नातेवाईकांनी काल ताब्यात घेतलं. त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलेत.

मनीष गुप्ता यांची कार्यशाळा संपन्न लाइफ इन टॉप गेअर या व...

नगरमध्ये सावेडीतील माउली सभागृहात भारतातील प्रख्यात लाईफ व बिसनेस कोच मनीष गुप्ता यांचा लाईफ इन टॉप गियर हि व्यावसायिक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या माध्यमातून नगरच्या व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातील नागरिकांना मनीष गुप्ता यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं.

वनकुटे गावातील वनकुट्याच्या राजाची विसर्जन मिरवणूक पा...

धार्मिक आणि सामाजिक एकोपा जतन करत, एक गाव एक गणपती ही संकल्पना यशस्वी करत, पारनेर तालुक्यातील वनकुटे गावातील वनकुट्याच्या राजाची विसर्जन मिरवणूक आदर्शवत ठरली आहे. एक गांव एक गणपतीच असलेल्या या मिरवणूकिला उत्साहात प्रारंभ करण्यात आला. यावेळी पारंपारिक टाळ मृदंग,सनई यांसह महिलांनी देखील पारंपारिक पद्धतीने वेशभूषा करत डोक्यावर फेटे बांधले. मिरवणुकीमध्ये गुलाल ,डीजे फटाके, यांना फाटा देत एकदम शांततेत आणि शिस्तीत हि मिरवणूक पार पडली . घोड्यावर स्वार झालेले छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेली मुले आणि मावळे हे मिरवणुकीचे मुख्य आकर्षण बनले. गावाच्या चौकाचौकात आल्यावर महिलांच्या फुगडया, धनगर समाजातील लोकांनी पारंपारिक पद्धतिचा गोल राउंड करुन ठेका धरला, लहान मुलांच्या भजनी मंडळाच्या टाळाच्या आणि पखवाजाच्या ठेक्याने मिरवणुकीला खुप रंगत आणली होती.या प्रसंगी वनकुटे गावचे सरपंच राहुल झावरे, उपसरपंच बाळासाहेब गागरे, आदिनाथ ढवळे , डॉ नितिन रांधवन यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

pune metro-shreegonda
गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या  पारधी समाजातील तरूणांना शासकीय  आणि खाजगी क्षेत्रात नोकरी करण्याची मोठी संधी त्यासाठी पारधी समाजातील तरूणांनी गुन्हेगारी पासून लांब राहण्याची गरज आहे असे मत  जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी श्रीगोंदा येथे बोलताना केले  बुधवारी श्रीगोंद्यात रधी भिल्ल समाजातील समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुणाईचा मेळावा आयोजित केला होता यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रंजनकुमार शर्मा बोलत .

Comments for video: