#ताडोबात पुन्हा काळ्या बिबट्याचे दर्शन #Black Tiger in Tadoaba.

author Today's Farmer   7 мес. назад
521 views

4 Like   0 Dislike

#ViralSatya - संकटातही 'तो' एकटाच लढला, एकट्या कुत्र्यासमोर बिबट्...

#ViralSatya - संकटातही 'तो' एकटाच लढला, एकट्या कुत्र्यासमोर बिबट्या हारला - https://youtu.be/8ntaBJgVD24

Leopard in Junnar | जुन्नरमधील बिबट्या

Leopard is seen in Junnar District. Video shoot by Lohote Brothers in their farm. ----- जुन्नर तालुक्यातील एका रस्त्यावर रात्री लहोटे बंधुंनी बिबट्याचा हा व्हिडिओ शुट केला. डिंगोरे गावाच्या आसपास अनेक बिबटे संचार आहेत.

महाराष्ट्र केसरी बाला रफिकची कोल्हापूर करांनी काढली वा...

बाला रफीक शेखने अभिजीत कटकेला सहज नमवून ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेच्या विजेतेपदाची मानाची गदा प्रथमच पटकावून सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. मातीवरील कुस्तीत तो तरबेज आहे, परंतु ‘महाराष्ट्र केसरी’चे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून त्याने आठवडय़ातून दोनदा मॅटचाही सराव सुरू केला होता. या मेहनतीचेच फळ त्याला जेतेपदामुळे मिळाले. प्रतिकूल परिस्थितीतून घडणाऱ्या बाला रफीकला बुलढाण्यात योग्य मार्गदर्शन मिळत नव्हते. मग कोल्हापूरमध्ये त्याने कुस्तीचे व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यासाठी बरीच वर्षे घालवली. गणपतराव आंदळकर यांनी बाला रफीकवर कुस्तीचे संस्कार घडवले. तो आंदळकरांचा शेवटचा शिष्य ठरला. त्याने रविवारी जालना येथे पराक्रम गाजवल्यानंतर म्हणूनच ‘आंदळकर यांचा विजय असो’ हा नारा तिथे घुमू लागला. जून २०१८ पासून त्याने पुण्याच्या गणेश दांगट यांच्या आखाडय़ात ‘महाराष्ट्र केसरी’चे लक्ष्य समोर ठेवून सरावाला प्रारंभ केला. याशिवाय गणेश घुले आणि वांजळे वस्ताद यांचे मार्गदर्शनही बाला रफीकला लाभले आहे. महाराष्ट्र केसरीची गदा जिंकल्यानंतर आज प्रथमच बाला रफिक कोल्हापूरात दाखल झाला. ज्या कोल्हापूरच्या मातीत तो घडला आणि ज्या वस्तादांनी त्याला घडवले त्यांना आज बाला रफिकने आपली महाराष्ट्र केसरीची गदा अर्पण केली. त्याचबरोबर कोल्हापूरकरांचे प्रेम असेच कायम राहो ही अपेक्षा व्यक्त करत भविष्यात हिंद केसरी जिंकण्याचा मानस व्यक्त केला.

सुलतान घोड्याची किंमत तब्बल १ कोटी ११ लाख, सारंगखेडा बाज...

नंदुरबार - सारंगखेडा येथील घोडे बाजार जातिवंत घोड्याचा खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध आहे त्याच प्रमाणे किंमती घोड्याचा खरेदी विक्री या ठिकाणी होत असते या वर्षी सारंगखेडा घोडे बाजारात कोट्यावधी किमतीचे अश्व विक्रीसाठी दाखल झाले असून घोडे बाजरात येणाऱ्या अश्वप्रेमी महागडे घोडे पाहण्यासाठी सारंगखेडा घोडे बाजरात दाखल होत आहेत. घोड्याची किमत त्याची उंची रंग आणि चाल याच्यावर ठरत आसते घोडा जितका रुबाबदार तितकी त्याची किमत तितकी जास्त  सारंगखेड्याचा घोडे बाजारात दाखल झालेल्या सुलतान ची किमत एक लाख नाही दोन लाख नाही तर तब्बल एक कोटी ११ लाख आहे आपल्याला प्रश्न पडला असेल याची किमत इतकी का सारंगखेडा घोडा बाजरात दाखल २००० हजार घोड्यामध्ये रुबाबदार आहे सुलतान एखाद्या सुलताना प्रमाणे तो रुबाबदार आहे त्याची उंची  इंच आहे तो पंधरा शुभ्र आहे त्याचे डोळे निळे असून त्याची चाल रुबाबदार आहे तो आजपर्यत या घोडे बाजारातील सर्वात उंच घोडा आहे सुलतान ची सेवा करण्यासाठी २४ तास ४ मजूर असतात त्याचा खानपान ची विशेष काळजी घेतली जाते त्याला दररोज पाच लिटर दुध एक किलो गावराणी तूप आणि चणाडाळ गहू आणि बाजरी त्याच सोबत कोरडा आणि सुका चारा दिला जात आसतो . सुलतान मध्यप्रदेश मधील उजैन येथून आला आहे त्याचा मालक मानसिंग राजपूत हे सुलतान आमच्या परिवारातील एक सदस्य असल्याचे सांगतात. सारंगखेडा येथील घोडे बाजरात सुलतान नंतर बोलबाला आहे तो हुकूमसिंग अंजना यांच्या चेतक या घोड्याचा देश भरात झालेल्या घोड्याचा स्पर्धेत हा चेतक सलग साह वेळा विजयी ठरला आहे चेतक मारवाड जातीचा असून त्याचे चारही पाय पांढरे आहेत तो संपूर्ण काळा असून त्याचा डोक्यावर पांढरा पट्टा आहे याला पंचकल्याण अस म्हणतात चेतक ची उंची ६४ इंच आहे एखद्या पेहलवान प्रमाणे त्याचा खुराकाची काळजी घेतली जाते त्याचा आहारात दररोज ५ लिटर दुध १ किलो तूप अंडी गहू चना गहू आदी खाद्याचा समावेश आहे चेतकची रुबाबदार चाल अनेकांना भुरळ घालत आसते चेतक ला पाहण्यासाठी आलेले अश्वप्रेमी त्याचा सर्व आदा आपल्या डोळ्यात सामवून घेत आहेत.

गोवर - रूबेला लसीकरणाविषयी जाणून घ्या - श्वेता सिंघल, जिल्...

डॉ. दीपा दिनेश जोशी विषाणूजन्य आजाराचे वाढते प्रमाण बघता, जेव्हा पालक ताप हे प्रामुख्याने लक्षण घेऊन बालकांना बालरोगतज्ज्ञांकडे येतात, तेव्हा तापाबरोबर अंगावर पुरळ, लाल चट्टे असे काही आहे का बघितले जाते. ताप आणि त्यानंतर येणारी ‘रॅश’ किंवा पुरळ यामध्ये वेगवेगळे प्रकार दिसून येतात आणि त्यानुसार रोगाचे निदान करता येते. गोवर, रुबेला, स्कारलेट फीवर, इन्फेक्शन मोनोन्यूक्लिओसीस, डेंग्यू, कावासाकी, हॅण्ड फूट माऊथ डिसीज आदी आजारांमध्ये ताप आणि त्याबरोबर येणारे पुरळ बघून त्या आजारांचे निदान करता येते. गोवर व रुबेला ही याच आजारांपैकी एक असून गोवर हा विषाणूंपासून होणारा संसर्गजन्य आजार आहे. गोवरचे विषाणू शिंकण्या किंवा खोकण्यातून हवेत पसरतात. गोवर झालेल्या व्यक्तीकडून हा आजार अंगावर लाल पुरळ येण्याच्या तीन दिवस आधी व चार ते सहा दिवस नंतर दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होतो. गोवरमध्ये पुरळ प्रथम कपाळावर, कानामागे, मानेवर येतात. नंतर ते हाता-पायापर्यंत पसरते. रॅश किंवा पुरळ आल्यानंतर हळूहळू तापाचे प्रमाण कमी होते. पुरळ साधारणपणे आठवडय़ानंतर हळूहळू कमी होत जाते. त्वचेवर त्याचे काळपट व्रण काही दिवस राहतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे खोकला जाण्यास दोन आठवडे लागतात. हा आजार कोणत्याही वयोगटात होऊ शकतो. गोवर झालेल्या रुग्णामध्ये शरीरातील ‘अ’ जीवनसत्त्वाची मात्रा खूप कमी होते. जीवनसत्त्व ‘अ’ कमी झाल्याने रुग्णाला डोळ्यांचे आजार, अतिसार, न्यूमोनिया, मेंदूज्वर असे आजार होण्याचा संभव असतो. काही बालकांमध्ये जीवनसत्त्व ‘अ’च्या कमतरतेमुळे अंधत्व येते. गोवरमुळे होणारा न्यूमोनिया हा बऱ्याच वेळा तीव्र स्वरूपाचा असतो. यामध्ये श्वासनलिकेला सूज येऊन बालकांना श्वसनाला त्रास होण्याची शक्यता असते. ताप व तापात येणारे झटके कधीकधी मेंदूच्या आवरणांना सूज येऊन कोमामध्ये जाण्याचा धोका काही बालकांमध्ये दिसून येतो.

Black Tiger

Comments for video: